Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आपत्‍कालीन परिस्थितीला कनखर मनोधैर्याने सामोरे जावे -डॉ. वडजे

तरुण भारतbyतरुण भारत
February 25, 2026
in social
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – सध्या मानव निर्मित आपत्तीचे प्रमाण वाढले असून आपत्ती काळात आपण कणखर मनोधैर्याने आपत्ती व्यवस्थापनाचे कार्ये केले पाहिजे. त्याच बरोबर आपत्तीला सामोरे जाताना सजगतेने आपली सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पुअहो सोलापूर विद्यापीठातील रासेयो संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.  

 येथील श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात संचालक डॉ. राजेंद्र वडजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रकाश पाटील होते.

 पुढे डॉ. वडजे म्हणाले की, आपत्तीचे साधारणपणे दोन प्रकार असून नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती असे प्रकार आहेत. रासेयोमधील स्वयंसेवक समृध्द व चाणाक्ष करण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आपत्ती येण्याआगोदर पूर्वतयारी, आपत्ती काळातील सजगता आणि आपत्ती नंतर पूनर्वसन करण्यासाठी योग्य असे व्यवस्थापन करताना आपल्यात माणूसकी असली पाहिजे. तसेच आज जगता हवेचे प्रदुषणाने प्रमाण झपाट्याने वाढ होत असून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  माध्यमातून आपले व्यक्तिमत्व उत्तम बनवता येतो. प्रत्येकाने आपला स्वताचा स्वार्थ न पाहता व्यापक समाज हित जपले पाहिजे. समाज सुधारणा करण्यासाठी विधायक दृष्टिकोन विचारात घेतला पाहिजे. युवकांनी आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या सजग होऊन समाज सुदृढ बनविला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पुढे आले पाहिजे असे ही त्यांनी सांगीतले.

यावेळी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. रामेश्वर कोठावळे, कला शाखा समन्वयक डॉ. बिरा पारसे, डॉ. गुणवंत सरवदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज चिकराम, कार्यक्रम अधिकारी  प्रा. समाधान लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्रथम सत्रात प्रभारी प्राचार्य डॉ. संजय करंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकासाची संकल्पना याविषयावर उदाहरणासह मार्गदर्शन केले. तर व्दितीय सत्रात प्रसिध्द डॉ. धीरज जाधव यांनी प्रथमोपचार सीपीआर याविषयावर प्रात्यक्षिकांच्या सहाय्याने अनमोल असे विचार व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. आसावरी फरताडे यांनी तर आभार प्रा. समाधान लोंढे यांनी मानले.

बार्शी येथे आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संचालक डॉ. राजेंद्र वडजे. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. शेख, डॉ. कोठावळे, डॉ. पारसे, आदी उपस्थित होते.

Post Views: 35
Previous Post

नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे व्हा!

Next Post

संत गाडगे महाराजांच्या कार्यातून आदर्श घेऊन नागरिकांनी शहर विकासात योगदान द्यावे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत गाडगे महाराजांच्या कार्यातून आदर्श घेऊन नागरिकांनी शहर विकासात योगदान द्यावे 

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0809809

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697