पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रामचंद्र यशवंत गलांडे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतून विक्रीकर सहहायक पदी निवड झाली आहे .
रामचंद्र याचे प्राथमिक शिक्षण साठेनगर येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेत, दहावीचे शिक्षण पिलीव येथील जवाहरलाल शेतकी विद्यालयात, बारावीचे शिक्षण भाळवणी येथील न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर अभियाञीकीचे शिक्षण शेळवे येथे झाले आहे.
रामचंद्र गलांडे याच्या ह्या यशाबद्दल पिलीव परिसरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.























