वळसंग – (ता.द. सोलापूर) शासनातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजे एन.एम.एम.एस.परीक्षेस श्री शंकरलिंग प्रशालेतील इयत्ता आठवीमधील एकूण ३३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यांपैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेस घवघवीत यश मिळवून दिले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना संजयकुमार धनशेट्टी, विजयालक्ष्मी थळंगे, सिध्दाराम भैरामडगी,शैला निंबाळ,निलकंठ कवटगी, श्रीमंत भोसले,सिद्धारूढ हिरेमठ,स्नेहा हळगोदे, गंगाधर बिराजदार, विजय प्याटी, शिवराज अष्टगी,मल्लिनाथ गौडगाव यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, उपाध्यक्ष विश्वनाथ थळंगे, सदस्य शिवशरण प्याटी, प्रकाश दुधगी, मल्लिनाथ थळंगे, रमेश दुधगी, शंकर केशट्टी,संजय दुधगी, प्राचार्य विरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके आदिंनी अभिनंदन केले.
सदर परीक्षेच्या कामकाजासाठी परीक्षा विभाग प्रमुख बाळकृष्ण गुंड यांना कनिष्ठ लिपिक गौरीशंकर चनशेट्टी व शिक्षक बसवराज दुधगी यांचे सहकार्य लाभले.ग्रामीण भागातून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

























