Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

२६व्या निरंकारी क्रिकेट स्पर्धा – क्रीडा आणि शिस्तीचे प्रेरणादायी आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in sports
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक जागृती, मानवी मूल्ये आणि क्रीडाभावनेचा सुंदर संगम साकारत २६व्या बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे अत्यंत श्रद्धामय व अनुशासित वातावरणात संपन्न झाला. ही स्पर्धा केवळ क्रीडास्पर्धा नसून मानवता, एकता आणि सामूहिक प्रगतीचा सशक्त संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे.

२६ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील २४ अव्वल संघ सहभागी झाले आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, ओरिसा, कोलकाता, गुजरात, दिल्ली व दिल्ली एनसीआर येथील युवा खेळाडू शिस्त, संयम आणि बंधुभाव यांचे उत्तम दर्शन घडवीत आहेत. मैदानावरील त्यांची निष्ठा, मर्यादित आचारसंहिता आणि सेवाभाव या स्पर्धेला प्रेरणेचा उत्सव बनवित आहेत.


या भव्य आयोजनाचे कुशल नियोजन संत निरंकारी मंडळाचे सचीव श्री जोगिंदर सुखीजा यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. युवकांमध्ये स्पर्धेबाबत प्रचंड उत्साह असून मोठ्या संख्येने नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. ही स्पर्धा केवळ क्रीडागुणांना वाव देत नाही, तर आत्मसंयम, ऐक्यभाव आणि आध्यात्मिक जाणीव अधिक दृढ करते.

या स्पर्धेची सुरवात बाबा हरदेव सिंहजी यांनी बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ केली होती. युवकशक्तीला संयम, शिस्त आणि सेवाभावाच्या मार्गावर प्रेरित करण्यासाठी क्रीडा हे प्रभावी माध्यम असल्याचा बाबा गुरबचन सिंहजीचा दृढ विश्वास होता.

या शुभारंभ प्रसंगी श्रीमती राजकुमारीजी ,प्रधान-संत निरंकारी मंडळ तसेच केंद्रीय योजना आणि सल्लागार समितीचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र सिंहजी यांची विशेष उपस्थिती लाभली. यांच्या सोबत मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

या प्रसंगी खेळाडूंना आशीर्वचन देताना श्रीमती राजकुमारीजी यांनी सांगितले की, २६वी ही स्पर्धा सन २००० मध्ये लुधियाना येथून प्रारंभ झाली असून २०२१ नंतरही त्याच उद्देशाने अखंडपणे सुरू आहे. बाबा गुरबचन सिंहजीच्या मतानुसार, “शरीर निरोगी असेल तरच खरी भक्ती साध्य होऊ शकते,” कारण मानवदेह हा परमात्मप्राप्तीचे साधन आहे. खेळ आपल्याला कोणतीही परिस्थिती असो, मनःस्थिती संतुलित ठेवण्याची आणि विजय-पराजयापलीकडे जाऊन प्रेम, नम्रता व बंधुभाव जपण्याची शिकवण देतात. निरोगी शरीरामुळेच आपण सेवाकार्यात योगदान देऊ शकतो आणि भक्तीत आनंद अनुभवू शकतो. खेळामुळे सहनशीलता, मर्यादा आणि शिस्त यांसारखे गुण विकसित होतात. “थकायचे नाही, अहंकार बाळगायचा नाही, झुकायचे नाही” या भावनेने निरंकार चरणी प्रार्थना आहे की सर्वजण निरोगी राहोत, क्रीडाभावनेने पुढे जावोत आणि प्रेम व आनंदाने जीवन व्यतीत करो.


स्पर्धेचे सुरळीत व यशस्वी आयोजन होण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सहभागी खेळाडू व प्रेक्षकांच्या सोयीसाठी निवास, वैद्यकीय सेवा, अल्पोपहार, आपत्कालीन मदत, सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनतळ यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हा उपक्रम सुव्यवस्थित, संस्मरणीय आणि यशस्वी ठरत आहे.


ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून युवकांसाठी आत्मिक जागृती व जीवनमूल्यांच्या संवर्धनाची अनोखी संधी आहे. दररोज सायंकाळी आयोजित सत्संग कार्यक्रमांमुळे युवकांना मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि चेतनेच्या उन्नतीची प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे ते क्रीडेसह जीवनातील खरे ध्येय प्राप्त करू शकतील.


निःसंशयपणे, सतगुरूंच्या दिव्य मार्गदर्शनाखाली आयोजित बाबा गुरबचन सिंह मेमोरियल क्रिकेट स्पर्धा क्रीडाभावनेसह मानवएकतेचे आदर्श दृढ करत समाजाला सकारात्मक दिशा देणारी ठरत आहे.

Post Views: 69
Previous Post

ड्रीलिंगच्या धुळीने पिके करपली; शेतकऱ्यांचा सोलर कंपनीविरोधात संताप

Next Post

श्रीपूरच्या कर्मयोगी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांची सर्व बिले अदा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्रीपूरच्या कर्मयोगी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांची सर्व बिले अदा

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1236713

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!