पंढरपूर – नगरपरिषदेतर्फे एनयुएलएम (NULM ) विभागामार्फत बचत गटातील महिलांसाठी ओला व सुका कचरा व्यवस्थापना बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर व पुनर्निर्मिती (Recycling) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना स्वच्छता व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेण्याचे देखील यावेळी एनयुएलएम विभागाच्या आधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले.
दरम्यान यावेळी बचत गटातील महिलांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत “कचरा वेगळा करा” हा संदेश पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पंढरपूर घडविण्यासाठी आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे असे देखील आवाहन बचत गटातील उपस्थित महिलांना यावेळी एनयुएलएम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

















