सोलापूर – मुलांना मोबाईलचे गुलाम न बनवता ओळखा आणि वेळीच सावरा, त्यांना स्मार्ट बनवा’; डॉ. गजानन खरात यांचे पालकांना आवाहन मुलांनी रविवारी फक्त अर्धा तास मोबाईल वापरण्याची शपथ घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना ठाकरे यांच्या प्रेरणेने ठाकरे किड्स स्कूलमध्ये ‘मोबाईल व्यसनाधीनता आणि अभ्यास’ विषयावर विशेष पालक सभा संपन्न झाली.
याप्रसंगी डाॅ.गजानन खरात सर हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष स्थानी संदिप ठाकरे हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रावणी पिसाळ मॅडम यांनी केले.
यावेळि कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे व व्याख्याते डाॅ.गजानन खरात सर यांनी पुढिल प्रमाणे मार्गदर्शन केले, आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे संवादाचे साधन न राहता ते मुलांसाठी एक व्यसन बनत चालले आहे. मुलांच्या हातातील मोबाईल सोडवून त्यांना अभ्यासाकडे वळवायचे असेल, तर केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही, तर पालकांना आपल्या घरातील वातावरण बदलावे लागेल, स्वतः आदर्श बनून मुलांसमोर स्वतःचा स्क्रीन टाईम कमी करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि करिअर समुपदेशक डॉ. गजानन खरात जिल्हा ताणतणाव नियंत्रण समितीचे सदस्य यांनी केले.
येथील ‘ठाकरे किड्स स्कूल’मध्ये आयोजित ‘मुलांचा मोबाईल वापर टाळून अभ्यासास प्रोत्साहित करणे’ या विषयावरील विशेष पालक मार्गदर्शक सभेत ते बोलत होते. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संपन्न झालेल्या या सभेला पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
मोबाईल आणि डोपामाईनचा खेळ
मार्गदर्शन करताना डॉ. खरात यांनी मुलांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांची मानसशास्त्रीय माहिती दिली. ते म्हणाले की, “मोबाईलवर गेम्स खेळताना किंवा रिल्स पाहताना मुलांच्या मेंदूतून ‘डोपामाईन’ नावाचे रसायन स्रवते, जे त्यांना त्वरित आनंद देते. यामुळे मुलांना अभ्यासासारख्या संथ पण शाश्वत गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांना ‘डिजिटल बेबीसिटर’ म्हणून मोबाईल देणे थांबवले पाहिजे.”
पालक की घरातील वातावरण?
यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, मुलांच्या या सवयीला केवळ पालकच नाही, तर घरातील संवादहीन वातावरण जबाबदार आहे. मुले ऐकून कमी आणि पालकांना बघून जास्त शिकतात. जर पालक स्वतः मुलांसमोर सतत मोबाईल वापरत असतील, तर मुले त्याचेच अनुकरण करणार. त्यामुळे घरात ‘नो-स्क्रीन झोन’ तयार करा आणि जेवताना व झोपताना मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.
शिक्षक आणि पालकांचा समन्वय गरजेचा
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक ही एकाच रथाची दोन चाके आहेत. शिक्षकांनी अभ्यासाला रंजक बनवणे आणि पालकांनी घरात अभ्यासासाठी पूरक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. घरात गोष्टीची पुस्तके, बैठे खेळ , छंद जोपासणे, मुलांच्या छोट्या यशाचे ही कौतुक करणे, ज्यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी लागेल, असेही डॉ. खरात यांनी नमूद केले.
पालकांसोबत केलेल्या सर्वे नुसार मोबाइल वापराचा मुलांच्या शारीरिक आरोग्यावर चिडचिडेपणा रागावणे 53% चित्त एकाग्र न होणे 33%, डोळ्यांच्या समस्या 23%, अभ्यासात लक्ष न लागणे 53%, झोप न येणे उशिरापर्यंत झोपणे 23% मुलांवर परिणाम झाला आहे हे निदर्शनास आले आहे. 4 तासात पर्यंत मोबाईल बघणारे मुले ही 3% टक्के आढळून आले आहे.ते रिस्क झोन मध्ये आहेत.
मोबाईल रिस्क कमी करण्यासाठी उपाय सुचवताना त्यांनी नो स्क्रीन झोन ऐवजी स्टडी झोन तयार करावा. दैनंदिन वेळापत्रक ठरवून त्यानुसार अभ्यासाला बसणे, पुस्तक वाचणे छोटी छोटी ध्येय ठरवणे बैठी खेळ खेळणे आऊटडोअर गेम साठी जाणे , निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येणे बाग बगीचे प्रेक्षणीय स्थळे यांना भेट देणे, तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करा, नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणे. दिवसभरातील किमान अर्धा तास कॉलिटी टाईम मुलांना द्या त्यात निवांत गप्पा मारा त्यांच्या भावना समजून घ्या. असा सल्ला डॉ. गजानन खरात यांनी दिला
कार्यक्रमाच्या शेवटि मुलांनी रविवारी फक्त अर्धा तास मोबाईल वापरण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. खरात यांनी शंका समाधान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रंजना ठाकरे व राजश्री माचेवार, स्मिता टाकाळकर, माधुरी नामदे, मोनिका शहाणे, प्रतिक्षा कनकुटे, रसिका दिक्षित, आदिती लोळगे, वैष्णवी पोटाबत्तीन, श्रावणी पिसाळ, शीला राऊत व संजीवनी सोनवणे इत्यादि शिक्षक वृंद परिश्रम घेतले.
मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेच्या वतीने करण्यात आले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























