सोलापूर – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सोलापूर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सोलापूर, नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे, रोटरी ईलाईट सोलापूर व रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे आयोजित मोफत तिरळेपणा व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला.
या शिबिरामध्ये एकूण ६८ रुग्णांवर तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून गरजू रुग्णांना मोफत अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात आली.
समारोप प्रसंगी नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांनी मनोगत व्यक्त करत तिरळेपणा हा लपवण्याचा नव्हे तर उपचार करण्याचा आजार असून योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचा आत्मविश्वास व दृष्टी दोन्ही सुधारतात, असे सांगितले. समाजातील गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्थांचे संयुक्त कार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी मनोगतात सांगितले की, तिरळेपणामुळे अनेक रुग्ण मानसिक व सामाजिक अडचणींना सामोरे जातात. मात्र वेळेत निदान व उपचार उपलब्ध झाल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारते. जिल्हा रुग्णालयामार्फत अशा विशेष शिबिरांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात डॉ. राजेश पवार, रो. अजय डोईजोडे तसेच रो. विक्रम बंडेवार यांनी मनोगत व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, जिल्हा नेत्रतज्ज्ञ डॉ. गणेश इंदुरकर,डॉ वैभव वनसरे रो. बालमुकुंद राठी, रो. रोशन भुतडा, रो. प्रमोद देशपांडे तसेच डॉ. खान मॅडम रो राहुल डोंगरे मेट्रन विजयलक्ष्मी बेले उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी तसेच डॉ. रोहन वायचळ, विकास लिंगराज यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पल्लवी अंभोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद देशपांडे यांनी केले सर्व रुग्ण व नातेवाईकांसाठी आस्था सामाजिक संस्थेकडून पौष्टिक व रुचकर जेवणाची व्यवस्था करण्यात आली


























