सोलापूर येथील दि हेरिटेज लॉन्सचे मालक श्री.मनोजशेठ शहा यांचे वडील व सोलापुरातील नावाजलेले प्रसिद्ध उद्योगपती श्री.कांतीलालशेठ शंकरलाल शहा यांचे वृद्धापकाळाने व आजाराने निधन झाले,ते 86 वर्षांचे होते,त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11.30 वाजता गांधी नगर,दि हेरिटेज लॉन्स येथील राहत्या निवासस्थानापासून निघणार आहे,त्यांच्यावर रुपभवानी मंदिराजवळील मारवाडी स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.तीर्थस्वरुप काकाजी गेल्या महिन्यापासून आजारी होते,यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते.आज सकाळी म्हणजे रविवार दि.5 मार्च रोजी पहाटे 5.15 वाजता त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली आणि क्षणार्धात आपला आधारवड व मार्गदर्शक नाहीसा झाला.काकाजी यांच्यामागे पत्नी,उद्योग पती मुलगा मनोजशेठ,सून,चार मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे,त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे, अनेकांचा पोशिंदा गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.कै. काकाजी यांना हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटीच्याने भावपूर्ण श्रद्धांजली….
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...