Thursday, March 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्थायी समितीच्या सहाव्या महिला सभापतीपदाच्या मानकरी ठरणार रंजीता चाकोते 

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या 49 व्या सभापती पदी भाजपच्या रंजीता चाकोते यांची बिनविरोध निवड होणार आहे. स्थायी समितीच्या सहाव्या महिला सभापतीपदाच्या मानकरी  रंजीता चाकोते या ठरणार आहेत. तर महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत भाजपचे पाच सभापती झाले असून सहाव्या सभापती पदी रंजीता चाकोते या विराजमान होणार आहेत.

         सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1964 मध्ये झाली. महापालिकेत आर्थिक अधिकार असलेली महत्त्वपूर्ण समिती म्हणून स्थायी समितीकडे पाहिले जाते. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या समिती सभापतीकडे असतात. स्थायी समिती ही केवळ एक समिती नसून महापालिकेच्या आर्थिक, धोरणात्मक आणि विकासात्मक निर्णयांची ‘केंद्रबिंदू’ मानली जाते.

महापालिकेच्या कामकाजात स्थायी समितीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अंदाजपत्रक मंजुरीपासून विविध विकासकामांच्या निविदा, खर्च मंजुरी, निधी वितरण, प्रशासकीय मान्यता अशा अनेक निर्णायक बाबी या समितीमार्फत पार पडतात. त्यामुळे या समितीचा सभापती म्हणजे शहराच्या विकासाच्या गतीला दिशा देणारा प्रमुख घटक ठरतो. 

        स्थायी समिती सभापतीपदी आतापर्यंत एकूण 48 जणांनी हे महत्त्वपूर्ण सांभाळले. सोलापूर महापालिकेत स्थायी समितीच्या पहिल्या सभापतीपदी एकनाथ तुळशीराम माने हे विराजमान झाले होते. दिनांक 1 मे 1964 ते 30 जून 1966 या कार्यकाळात त्यांनी सभापतीपद भूषविले. त्यानंतर एकूण 48 सभापतींनी कामकाज पाहिले. यामध्ये आत्तापर्यंत एकूण 5 महिलांना सभापतीपदी संधी मिळाली होती. त्यानंतर आता सहाव्या महिला सभापती पदी भाजपच्या रंजीता चाकोते यांना मान मिळत आहे.सन 2018 नंतर आठ वर्षांनी सोलापूर महापालिकेला स्थायी समितीचा चेअरमन लाभणार आहे.

       दरम्यान, महापालिका स्थापनेनंतर भाजपचे एकूण पाच सभापती झाले होते. यंदा रंजीता चाकोते या भाजपच्या सहाव्या सभापती होणार आहेत. भाजपचे पहिले स्थायी समिती सभापती होण्याचा मान लिंगराज वल्याळ यांना 13 मे 1985 ते 30 एप्रिल 1986 या कालावधीत मिळाला. (स्व.) लिंगराज वल्याळ हे पुढे

  भाजपचे आमदार आणि खासदार झाले होते. त्यानंतर जगदीश पाटील 5 जून 1998 ते 5 मार्च 1999, सूर्यकांत (सुरेश) पाटील 5 मार्च 1999 ते 4 मार्च 2000, प्रा. मोहिनी पतकी 4 मार्च 2000 ते 2 मार्च 2001 संजय कोळी 18 मार्च 2017 ते 1 मार्च 2018 आणि त्यानंतर आता सहाव्या सभापती पदाचा मान रंजीता चाकोते यांना मिळत आहे. 

या मान्यवर महिलांनी भूषविले सभापती पद !

स्थायी समिती सभापती पदी आत्तापर्यंत एकूण 5 महिलांना संधी मिळाली आहे. तर आता सहाव्या महिला सभापती म्हणून भाजपच्या रंजिता चाकोते यांची निवड होत आहे. पहिल्या महिला सभापती पदाचा मान प्रभावती मसरे यांनी  (1 मार्च 1994 ते 21 मार्च 1994 ) मिळाला होता. त्यानंतर शिवलिंगम्मा आसादे (21 मार्च 1994 ते 19 फेब्रुवारी 1996), प्रा. मोहिनी पतकी (4 मार्च 2000 ते 2 मार्च 2001), विजयाताई थोबडे (2 मार्च 2001 ते 1 मार्च 2002), हणमंती करगुळे ( 5 मार्च 2008 ते  3 मार्च 2009 ) यांनी सभापती पदाची जबाबदारी सांभाळली.  आता सहाव्या सभापतीपदी रंजीता चाकोते या विराजमान होत आहेत.

Post Views: 12
Previous Post

कंदर–सातोली शिवरस्ता तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Next Post

‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धा; सोरव, श्रेयस, पृथा विजेते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धा; सोरव, श्रेयस, पृथा विजेते

ताज्या बातम्या

अमर सुरवसे यांचे IBPS परीक्षेत यश; कृषी अधिकारी पदासाठी निवड.

March 5, 2026

भाषा अस्तित्वात राहिली तरच समाज आणि संस्कृतीही टिकून राहील : प्रा. नानासाहेब गव्हाणे

March 5, 2026

करजगी एमएसईबी येथील सुरक्षा गार्ड माजी सैनिक श्रीकांत मोरे सेवानिवृत्त

March 5, 2026

अभिनंदन प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

March 5, 2026

मध्य रेल्वेच्यावतीने ‘सेवा संकल्प ठराव’

March 5, 2026

‘जेएनयू’च्या कुलगुरूंची हकालपट्टी करा!

March 5, 2026

ए.जी. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे एन पी टी ई एल परीक्षेत घवघवीत यश

March 5, 2026

ग्रहण स्पर्शानंतर देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नाननैवेद्यात बदल

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0715972

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697