Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धा; सोरव, श्रेयस, पृथा विजेते

तरुण भारतbyतरुण भारत
March 5, 2026
in sports
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था, श्री. रामराव शिंदे मित्र परिवार, सोलापुर चेस अकॅडमी व सोलापूर चॅम्प स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त सौरव साहू याने सात पैकी साडेसहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तर स्पर्धेतील सोलापूरचा अग्रमानांकित श्रेयांस शहा व बारामतीचा शौर्य बोंडवे, बार्शीचा शंकर साळुंके यांचे प्रत्येकी सहा गुण झाल्यामुळे सरस बुचोल्स गुणपद्धतीवर श्रेयांस, शौर्य व शंकर यांनी अनुक्रमे द्वितीय, तिसरा व चौथा क्रमांक पटकाविला. तसेच १५ वर्षे वयोगटात लातूरच्या राघव भंडारगे यानेउत्कृष्ट खेळ करत जेतेपद मिळविले व व महिला गटात प्रेरणा पवार व सान्वी गोरे यांचे प्रत्येकी पाच गुण झाल्यामुळे सरस टाय-ब्रेकमध्ये  प्रेरणाने अव्वल व सान्वीने द्वितीय स्थान प्राप्त केले.  

११ वर्षाखालील निवड स्पर्धेत सोलापूरचा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त श्रेयस कुदळे याने आकर्षक खेळ करत सहा पैकी साडेपाच  गुणांसह व बार्शीची पृथा ठोंबरे हिने पाच पैकी पाच गुण मिळवीत उल्लेखनीय कामगीरी करत जेतेपद पटकाविले तर सिद्धांत कोठारी व ओजस्वी बोराळे यांनी चांगला खेळ करत दुसरे स्थान मिळवीत जिल्हा संघातील आपले स्थान पक्के केले.  तसेच विविध वयोगटात नियान कंदीकटला, लखित काबरा, मंगळवेढ्याची संस्कृती जाधव, ज्ञानदा सांगुळे यांनीदेखील सुरेख खेळ करत ९ व ७ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. 

टाकळीकर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोलापूर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे, मातोश्री लक्ष्मीबाई पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन राजन ढवण, बार्शीचे दत्तात्रय गोरे, टाकळीकर मंगल कार्यालय समूहाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये, आंतरराष्ट्रीय पंच व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले.

विजेत्या खेळाडूंना ‘शिवछत्रपती चषक’, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या ७५ खेळाडूंना एकूण रु. ३०००० ची पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे यांनी तर सहाय्यक म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा-राठी, विजय पंगुडवाले, जयश्री कोंडा, प्रज्वल कोरे, यश इंगळे व पद्मजा घोडके यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले. 

विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले. 

अंतिम निकाल (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह):

खुला गट: सौरव साहू – ६.५, श्रेयांश शहा- ६(३०.५), शौर्य बोंडवे- ६(२६), शंकर साळुंके- ६(२५), सानिध्य जमादार- ५(२९.५),  विशाल पटवर्धन- ५(२९), चंद्रशेखर बसरगीकर- ५(२८), देवदत्त पटवर्धन-५(२६.५), ओंकार कार्वेकर- ५(२५),  नितीन अग्रवाल- ५(२४)

१५ वर्षे वयोगट: राघव भंडारगे – ६, वेदांत मुसळे- ५.५, अदिराज म्हेत्रे- ५(२९), आयुष जानगवळी- ५(२७.५), विहान कोंगारी- ५(२५), प्रवीर देशमुख- ४.५, सार्थक राऊत- ४(२९), होरम थेंमझन- ४(२६.५), आदित्य डोके- ४(२५), शार्विल डांगे- ४(२४.५), 

महिला गट: प्रेरणा पवार – ५(३०), सान्वी गोरे- ५(२९.५), समृद्धी मक्तेदार- ४.५, सृष्टी गायकवाड-४(२७.५), पलक टकले – ४(२४.५), श्रीनिधी शाबादे – ४(२३), विद्या वास्कर – ४(२२.५), स्वरा कस्तुरे – ३(२५), श्रावणी मुत्येलू – ३(१९), आरोही दलाल – ३(१८.५)

११ वर्षे (मुले): श्रेयस कुदळे – ५.५, सिद्धांत कोठारी- ५(२१), हिमांशू व्हनगावडे- ५(२०), वेदांत पांडेकर- ५(१९), प्रतीक हलमल्ली- ५(१७.५), नचिकेत तोंडले- ५(१७), हर्ष जाधव- ४.५(२२.५), प्रथम मुदगी- ४.५(१९), श्रेयश इंगळे- ४.५(१६.५), नैतिक होटकर- ४(२२)

९ वर्षे (मुले): नियान कंदीकटला – ४(२०.५), नमन रंगरेज – ४(१९), कृष्णराज पटाले – ४(१६), रिषभ पामनानी – ४(१५.५), विवेक स्वामी – ३(२०)

७ वर्षे मुले: लखित काबरा – ३(१७), आरुष माने – ३(१६.५), विराज शेंडगे – २(१६), अजान शेख- २(१४), मिथिलेश होर्टिकर- २(१३)

११ वर्षे (मुली): पृथा ठोंबरे – ५, ओजस्वी बोराळे- ४(१७), सृष्टी मुसळे – ४(१४), आर्वी सदाफुले – ४(११), अनुश्री कुमठेकर – ३(१६), आहाना शेख – ३(१५), तेजस्विनी कांबळे – ३(१४), समृद्धी कसबे – ३(१३), श्रुती बनसोडे – ३(१२), स्वराली बिराजदार – ३(११)

९ वर्षे (मुली): संस्कृती जाधव – ४, हर्षा क्षीरसागर – ३(१३), इशा पटवर्धन – ३(१२), समिधा चंदनशिवे – २(११), श्रीशा हरसुर – २(१०)

७ वर्षे (मुली): ज्ञानदा सांगुळे – ३(११), अनन्या गाडे – १ 

उत्तेजनार्थ बक्षिसे: ऋग्वेद करजगीकर, वेदिका घरबुडवे, स्वरा दंतकाळे, संदेश गायकवाड, शिवरत्न गोरे

फोटो ओळी: ‘शिवछत्रपती चषक’ बुद्धिबळ स्पर्धेतील विजयी खेळाडूंसमवेत रामराव शिंदे, दत्तात्रय गोरे, सुमुख गायकवाड, राजन ढवण, अतुल कुलकर्णी, नीलम उपाध्ये,  संतोष पाटील, भैरवी शिंदे, उदय वगरे आदी.

Post Views: 62
Previous Post

स्थायी समितीच्या सहाव्या महिला सभापतीपदाच्या मानकरी ठरणार रंजीता चाकोते 

Next Post

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895667

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697