Monday, August 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली – कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा

IAS Tukaram Mundhe यांच्यासारखा कणखर माणूस राजकारण्यांना पचवणं जड जातं....

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 29, 2022
in maharashtra
0
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली – कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा
0
SHARES
360
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात जे घडलं तेच शिंदे सरकारच्या काळात घडलं… महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तर, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटीचा कार्यभार देखील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश काढले आहेत. कार्यमुक्त होऊन पुढील आदेशाची वाट पाहा, असं राज्य सरकारनं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या धडक कामाची काही अधिकाऱ्यांनी राज्याच्या एका मंत्र्याकडे तक्रार केल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त करण्याच्या हालचाली झाल्याच्या चर्चा आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. या दौऱ्यांच्या काळात जे अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे वागतील त्यांना मुंढे यांनी त्यांच्या खास शैलीत इशारा दिला होता.

तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक भूमिकेमुळं काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यातूनच काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात तुकाराम मुंढे यांना सूचना देखील केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या सर्व बाबी समोर येऊन आठवडा होत असतानाच तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची एमएमआरडीए मुंबईच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. भाग्यश्री बानायत यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या मुख्य कार्यकारी पदावरुन विदर्भ स्थायी विकास महामंडळ नागपूरच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.विनय मून यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. सुनील चव्हाण यांची कृषी विभाग पुणेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. , एस.एम.कुरकोटी यांच्याकडे भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. सौम्या शर्मा यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागातील सहायक जिल्हाधिकारी पदावरुन नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

Post Views: 175
Previous Post

कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीला भीषण आग, 15 ते 16 झोपड्या जळून खाक

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का ….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का ….

उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का ....

ताज्या बातम्या

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

August 23, 2026
नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

August 23, 2026
देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

August 23, 2026

प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा; निरोगी भविष्यासाठी आजच सवय बदला

August 23, 2026

महसूल गळती, आश्रमशाळा अन् रस्ता सुरक्षेवर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

August 23, 2026

डॉ. आर. आर. पाटील यांना करिअर डेव्हलपमेंट व ट्रेनिंग-प्लेसमेंट क्षेत्रातील दोन मानाचे पुरस्कार

August 23, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

August 23, 2026

निधी खात्यावर, कामे कागदावर; ८५ कोटी खात्यावर; विकासकामे मात्र ठप्प!

August 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1108446

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!