सोलापूर – छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त प्रतीवर्षाप्रमाणे संभाजी आरमारच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ६३ मावळ्यांनी रक्तदान करत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली.
या वेळी महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता केदार चोबे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, युवा उद्योजक मनिष सुरवसे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्य तर अबाधित राहिलेच, मात्र त्या बलिदानाने औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत मिसळण्याची कामगिरी केली. अखिल हिंदुस्थानावर शंभूराजांचे अमिट उपकार आहेत. संभाजी महाराजांच्या बलिदानाला मुजरा करण्यासाठी संभाजी आरमारच्या मावळ्यांनी रक्तदान केले.
यावेळी संभाजीरामाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, संघटक डांगे, राज जगताप, अजिंक्य पाटील, राजू आखाडे, ज्ञानेश्वर डोंबाळे प्रमोद जगताप, अमित कदम, बालाजी पवार, द्वारकेश बबलादी, सागर सांगवी, अँड गीता पवार, शोभा घंटे, रेवन कोळी, शिवानंद कटके, प्रशांत पवार, प्रवीण मोरे, सागर दासी, राजू रच्चा, सुधाकर करनकोट यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
























