सोलापूर – कोरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना ९ मार्च १९०९ रोजी झाली होती. त्याचे औचित्य साधून शाळेचा वाढदिवस व वार्षिक स्नेहसंमेलन शाळेने आयोजित केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुज्ञानी पाटील होत्या व कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांचे हस्ते उदघाटन झाले. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्या विमल खताळ यांचे चिरंजिव अक्षय खताळ व पंचायत समिती सदस्या कोमल आवताडे यांचे पती अंकुश आवताडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले .
शाळेचा ११७ वा वाढदिवस सरपंच सुज्ञानी पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिनाथ म्हमाणे व सर्व मान्यवर यांचे हस्ते केक कापून करण्यात आला.यावेळी एपीआय जकीकोरे व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बालचमुचा नृत्य अविष्कार व कला सादर करण्यात आले .
यावेळी विस्तार अधिकारी अतुलकुमार माने, केंद्र प्रमुख बी. डी. राठोड ,ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व सदस्य , तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील,आजी माजी पदाधिकारी ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सीता पाटील, सुहास पाटील, संतोष माळगोंडे, अभिजित ननवरे, जगदेवी यादव यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
























