जेऊर – अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ केम संचलित, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला आदर्श आश्रमशाळा पुरस्कार तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव समिती करमाळा यांचे तर्फे प्राप्त झाला आहे. आश्रमशाळेमध्ये शिक्षणा बरोबर विविध स्पर्धा, रात्र अभ्यासिका, मनःशांती प्रयोग , विविध व्यायाम व आध्यात्मिक वारकरी शिक्षण शिकविले जाते. एकंदरीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो.संस्थेचे चेअरमन श्री सुदर्शन तळेकर व संस्थेची व्यवस्थापन कमिटी जातीने लक्ष देते. मुख्याध्यापक श्री नितीन जगताप व शिक्षक-
शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हिरिरीने काम करतात. याची दखल घेऊन शाळेला आदर्श आश्रमशाळा पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार शिवसेना जिल्हा प्रमुख श्री महेश चिवटे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष श्री राजेंद्र बारकूंड व श्री शेटे डॉक्टर इत्यादींच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

























