सोलापूर – संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्याच्या शेजारी राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मृतिस्थळ किंवा स्मारक व्हावे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शन करण्यात आले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचा विजय असो, सोलापूर शहरांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचे स्मारक किंवा स्मृतिस्थ झालेच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सोलापूर शहरांमध्ये कुठेही राष्ट्रमाता जिजाऊंचे पुतळा किंवा स्मारक नाही त्यामुळे विविध कार्यक्रम प्रसंगी अभिवादन करताना शिवभक्तांना मोठी अडचण येत आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकामध्ये प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. भाजपचे पालकमंत्री आमदार जाणून बुजून मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, सतीश शिरसाट, मंगल सिंह ठाकुर, रमण शिवशेट्टी, शेखर भोसले, विक्रम वानकर, दिलीप भोसले, संतोष सुरवसे, सिताराम बाबर, राजेंद्र माने, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.























