वेळापूर – माने देशमुख परिवाराच्या मार्गदर्शिका सोनिया गोरे यांनी वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर येथे भाजपाचे कार्यकर्ते मदनसिंह माने देशमुख यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया जयकुमार गोरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माने देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी सौ. सोनिया गोरे यांचा सौ. सुवर्णमाला माने देशमुख यांच्या हस्ते शाल, हार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या भेटीदरम्यान मदनसिंह माने देशमुख, सोमनाथ सावंत, पृथ्वीराज माने देशमुख, सौजन्य टिंगरे, कृष्णा लोहार, माऊली पवार, बाळासाहेब पिसे, आदित्य चिंचकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. सोनिया गोरे म्हणाल्या की, “मदनसिंह माने देशमुख आणि त्यांच्या परिवाराने सामाजिक क्षेञात केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी भाजप पक्षासाठी निष्ठेने व जोमाने काम सुरू ठेवावे. तसेच त्यांनी सुरू केलेल्या विविध व्यवसायातही जिद्द, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या बळावर आणखी मोठी प्रगती साधावी,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
त्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे माने देशमुख परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


























