वेळापूर – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वेळापूर जिल्हा परिषद गटातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या सौभाग्यवती सौ. मिनाक्षी मिलिंद सरतापे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन करत जिल्हा परिषद सदस्यपद मिळवले आहे.
विजयानंतर सौ. मिनाक्षी सरतापे यांनी मुंबई येथील संविधान बंगला येथे जाऊन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी ना. डॉ. आठवले यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. मिनाक्षी सरतापे यांचा सत्कार करून त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
समाजातील वंचित, दुर्बल घटकांच्या विकासासाठी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर ठामपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या कार्यातून समाजसेवा घडो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी
रिपाइं चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन. के. साळवे, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किरण (तात्या) धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जिल्हा सचिव भारत (नाना)आठवले,तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,
जिल्हा नेते धनाजी पवार, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कांबळे पाटील, वेळापूरचे विद्यमान सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे, युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे, लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष झुल्करभाई शेख, अण्णासाहेब भोसले, तुषार केंगार
तसेच रिपाइंचे युवराज (तात्या) सातपुते, तालुका उपाध्यक्ष पप्पूदादा गायकवाड, युवा आघाडीचे प्रेमसिंह कांबळे पाटील, तालुका सचिव समाधान हनुमंत भोसले, युवक कार्याध्यक्ष मिलिंद गायकवाड, अतिश आठवले, वेळापूर शहराध्यक्ष शरद साबळे, रणजीत सरवदे, विझोरी अध्यक्ष गौतम वाघंबरे, नवनाथ वाघंबरे, संजय इंगळे, संतोष जाधव, फळवणी अध्यक्ष महेंद्र धांडोरे,गणेश साठे, एस. के. लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. मिनाक्षी साठे, कोमल वायदंडे,ओंकार सरतापे, विराज वायदंडे तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























