सोलापूर : तळे हिप्परगा येथील नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील जीआरपी हॅकेथॉपन (GRP Hackathon) 2025 या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय स्थान मिळवले असून त्यांना रु. 2 लाखांचे रोख बक्षीस मिळाले आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधून निवडलेल्या केवळ आठ संघांमध्ये ऑर्किड महाविद्यालयाच्या संघाचा समावेश होता.
GRP लिमिटेडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या हॅकाथॉनमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना टायर पावडरचा पुनर्वापर करून सस्टेनेबल उत्पादने विकसित करण्याचे आव्हान देण्यात आले होते. ऑर्किड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टायर पावडरचा अभिनव वापर करून पर्यावरणपूरक उत्पादनाची कल्पना मांडत उत्कृष्ट सादरीकरण केले.
या संघामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील कु. वैष्णवी सावंत, कु. सानिया शेख, कु. मोईन शेख आणि कु. साफी सगरी यांनी टायर पावडरचा स्ट्रक्चरल वापर सिद्धांत विकसित केला. तर यांत्रिक अभियांत्रिकी शाखेतील कु. वैष्णवी अरवत, कु. वर्षा मंठाळकर, कु. स्नेहल शिंदे, कु. दर्शन गंगजी आणि कु. गणेश लिंबोळे यांनी टायर पावडर प्रक्रिया यंत्रणा व उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी रिसायकलिंग प्रक्रिया, मटेरिअल टेस्टिंग आणि व्यावसायिक मॉडेल विकसित करून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची प्रभावी मांडणी केली.
या संघाला डॉ. आर. आर. पाटील (SPOC), प्रा. आर. जी. मस्के (स्थापत्य अभियांत्रिकी) आणि डॉ. व्ही. एस. हिरेमठ (यांत्रिक अभियांत्रिकी) यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. मेतन ,डॉ. व्ही. के. पत्की तसेच स्थापत्य व यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते.
या यशस्वी आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल GRP लिमिटेडच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.





















