जेऊर – सध्याच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जेऊर ता करमाळा येथील शेती अवजारे बनवणाऱ्या येथील श्रीनाथ वेल्डिंग वेअर्सचे तात्यासाहेब भारत कळसाईत यांनी बनवलेल्या लोखंडी जुगाड चुलींना मोठी मागणी येत असून त्यांनी बनवलेल्या चुली महाराष्ट्रातच नाही तर हरियाणा राज्यातही विकल्या जात आहेत.
सध्या सुरू असलेला इराण अमेरिका इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाली आहे वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने लोक हैराण झाले असून पर्याय म्हणून सर्वत्र र्इलेक्ट्रिक चुलीची मागणी वाढली अशा प्रकारच्या चुलीही बाजारात उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी आपल्या पारंपारिक मातीच्या चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.
अशावेळी जेऊर येथील तात्यासाहेब कळसाईत यांनी चार इंची लोखंडी चौकोनी पाईपच्या सहाय्याने तयार केलेल्या लोखंडी जुगाडचुलीवर कमी इंधनांमध्ये स्वयंपाक होत असल्याने इंजन इंधन बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर या चुलींची मागणी वाढू लागली आहे. सध्या गहू हार्वेस्टिंग मशीनवर काम करणारे हरियाणा येथील लोक जेऊर येथे वेल्डिंग कामासाठी त्यांच्या वर्कशॉप मध्ये आल्यानंतर त्यांनीही चूल पाहिली त्यांना खूप आवडली गावाकडील मंडळींना मोबाईलद्वारे या चुलीची माहिती दिली. सध्या हरियाणा मध्ये ही मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई असल्याने त्याही मंडळींना ही चूल आवडल्याने त्यांनी कळसाईत यांच्याकडून गावाकडे घेऊन जाण्यासाठी आठ चुली खरेदी केल्या. व आणखी चुलीची ऑर्डर नोंदवली आहे या चुलीसंबंधी त्यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट पाहून अनेक लोकांनी या चुलीची त्यांच्याकडे मागणी केली असून सध्या वर्कशॉप मधील इतर कामे थांबून त्यांनी अशा प्रकारच्या चुली बनवण्यास प्राधान्य दिले आहे.
तात्यासाहेब भारत कळसाईत ( लोखंडी चुलीचे निर्माते जेऊर) जेऊर येथे माझा शेती उपयोगी लोखंडी अवजारे बनवण्याचा व्यवसाय आहे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मला स्वतःला घरगुती वापरण्यासाठी मी लोखंडी एक चूल तयार केली होती तिला मजुरीसह साधारण दीड हजार रुपये खर्च आला तिची टेस्ट घेतल्यानंतर या चुलीवर चांगल्या प्रकारे स्वयंपाक करता येत असून इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होत असल्याचे लक्षात आले व हाताळण्यासाठी ही सोयीस्कर असल्याने यासंबंधी माहिती मिळताच अनेकांनी अशा चुली बनवण्यास सांगितले आत्तापर्यंत अनेक जणांनी त्या खरेदी केल्या आहेत. सध्या तयार केलेल्या चुलीला मागणी असली तरी त्यामध्येही आणखी काही किरकोळ बदल करून अत्यंत सुलभ अशी चूल बनवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.
कळसाईत यांनी बनवलेल्या लोखंडी चुलीचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे या चुलीमुळे इंधनाची बचत होते. थोड्याशा लाकडाच्या वापर करून याच्यावर स्वयंपाक करता येतो. याच्या वैशिष्ट्यपूर्णरचनेमुळे धुर फारसा होत नाही एकदा लाकडाने पेट घेतल्यानंतर ते कायम पेटत राहण्यासाठी खालील बाजूने हवा येत राहते.
जेऊर तालुका करमाळा येथील बाबुराव कळसाईत यांनी बनवलेल्या लोखंडी जुगाड चूली


























