पंढरपूर – चैत्री एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक पंडित विश्वनाथ दाशरथे आणि आरती नाडगौडा यांच्या सुरेल आणि श्रवणीय भक्तीगीतांचा सत्संग चंद्रभागेच्या वाळवंटातीरी संपन्न झाला. या कार्यक्रमास वारकरी भाविकांसह, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उजनी (लातूर) येथून संत गणेशनाथ महाराजांची पालखी पंढरपूर क्षेत्री चंद्रभागेच्या तीरी विसावली, तिथं पालखी समोर कीर्तन प्रवचन महाप्रसाद आदी सुंदर कार्यक्रमाबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक पंडित विश्वनाथ दाशरथे, आरती नाडगौडा यांच्या सुरेल आणि श्रवणीय भक्तीगीतांचा सत्संग चंद्रभागेच्या वाळवंटातीरी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात झाली.त्यानंतर सुंदर ते ध्यान,अवघे गर्जे पंढरपूर,अबीर गुलाल उधळीत रंग, पद्मनाभा नारायणा,झुलत झुलत,कुणी सांगा कृष्ण देखिला,आम्हां न कळे ज्ञान,आदी अभंगरचना बरोबर संत गणनाथांच्याही भावपूर्ण रचना गात शेवटी हेंचि दान देगा देवा या अजरामर संतरचना भैरवी मध्ये गाऊन उपस्थित वारकरी भक्तांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कार्यक्रमात तितकीच सुंदर साथसंगत तबला पांडुरंग मुखडे, राजगोपाल गोसावी, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम स्वानंद कुलकर्णी तर बासरी श्री.देशपांडे यांनी केली. यावेळी उजनी आणि परिसरातील शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























