टेंभुर्णी – कन्हेरगाव येथील रहिवासी असलेल्या संयुजा संजय जाधव (रा. भांडगाव) हिची पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा उत्साहात सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या संयुजाने केलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा सत्कार समारंभ माजी ग्रामपंचायत सदस्य संपत चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. कन्हेरगाव येथील रामोशी वस्तीमध्ये जय मल्हार संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संयुजा जाधव हिचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक किसनराव खोचरे, माजी सरपंच मनीषा चव्हाण, दशरथ चव्हाण, संजय जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय उर्फ बाळासाहेब डोके पाटील यांच्यासह अशोकराव लांडगे, अनिल चव्हाण, कुमार चव्हाण, उमेश चव्हाण, गणेश जाधव, दादासाहेब चव्हाण, सुरेश माने, महादेव जाधव, दिनकर चव्हाण, सुनील चव्हाण, सुधीर चव्हाण, सुरज जाधव, तानाजी वीर, हनुमंत पाटोळे, आनंदा चव्हाण, बानू चव्हाण, सुलभा जाधव, राधाबाई माने, सुमन चव्हाण, सुरेखा चव्हाण, रूपाली चव्हाण, कल्पना चव्हाण, कोमल जाधव, मनीषा जाधव, वैशाली माने, प्रियंका मदने, प्रियंका चव्हाण, रेश्मा चव्हाण, शकुंतला चव्हाण, यमाई जाधव, बायडाबाई चव्हाण, पद्मिनी चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुजा जाधव हिने दहावीपर्यंतचे शिक्षण भांडगाव येथे पूर्ण केले असून पुढील शिक्षण सराटी येथे घेतले. अत्यंत साध्या परिस्थितीतून तिने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर पोलिस दलात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे कन्हेरगाव व परिसराचा मान उंचावला असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थितांनी संयुजाचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तरुणांनी तिच्या यशातून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण होते आणि ग्रामस्थांनी संयुजाच्या यशाचा आनंद साजरा करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


















