बार्शी – छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात अरुण नवले यांच्या ‘जागल’ या ग्रामीण कादंबरीला उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिफण साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामीण साहित्य चळवळ आहे.
याप्रसंगी अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे लेखक, समिक्षक, प्रमुख पाहुणे डॉ.ललिता गादगे जेष्ठ लेखिका, डॉ. सर्जेराव जिगे, प्रा मच्छिंद्र गोडे, प्रा डॉ. रमेश जाधव, प्रा. डॉ. रामचंद्र झाडे, तिफा तिफण मासिकाचे संपादक प्रा. डॉ शिवाजी हुसे, पुरस्कार प्राप्त लेखक, इतर मान्यवर, साहित्यिक यांच्या उपस्थितीत ग्रामीण लेखक अरुण नवले यांना सन्मानित करण्यात आले.
शाल.सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले. अरुण नवले यांच्या कादंबरीला हा चौथा पुरस्कार आहे. साहित्य रसिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आतापर्यंत साहित्य क्षेत्रांतील महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.


















