टेंभुर्णी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पारंपरिक वोट बँक मानल्या जाणाऱ्या मातंग समाजाला न्याय देण्यासाठी तसेच समाजाच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी माजी गृहमंत्री रमेश बागवे यांना विधान परिषदेत संधी देण्यात यावी, अशी ठाम मागणी कॉंग्रेस कमीटी चे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी सोलापूर येथे पक्ष निरिक्षक निरीक्षक देवाशिष पटनायक आणि मोहन जोशी यशराज पारखी आणि भाऊसाहेब आसबे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.
या मागणीसंदर्भात सोलापुरात संबंधित पक्ष नेतृत्वाकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मातंग समाजाने अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला निष्ठेने साथ दिली असून, पक्षाच्या वाढीत मोठे योगदान दिले आहे. मात्र, अद्यापही समाजाला अपेक्षित असे प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
रमेश बागवे व अविनाश बागवे हे दोघेही समाजातील सक्रिय, अनुभवी व जनतेच्या प्रश्नांवर काम करणारे नेते असून, त्यांना विधान परिषदेत संधी दिल्यास मातंग समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास
निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला.
तसेच, आगामी राजकीय नियुक्त्यांमध्ये मातंग समाजाचा योग्य विचार करून समाजाला न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा, कॉंग्रेस पक्षाला मातंग समाजाच्या वतीने तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल.अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,
जिल्हाउपाध्यक्ष सौदागर जाधव, उपाध्यक्ष रफिक शेख,माढा तालुका उपाध्यक्ष अनिल गवळी,उत्तर सोलापूर युवकचे तालुकाध्यक्ष महेश लोंढे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लखन, गायकवाड, धनराज वाघमारे उपस्थित होते.

















