सोलापूर – येथील द वॉरियर्स तायक्वांदो अकॅडमीचे पाच दिवसांचे ॲडव्हान्स तायक्वांदो प्रशिक्षण शिबिर आणि कलर बेल्ट परीक्षा उत्साहात संपन्न झाली.
ही परीक्षा वर्ल्ड तायक्वांदोच्या नियमानुसार इंडिया तायक्वांदो, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या मान्यतेने घेण्यात आली.
परीक्षक सोमनाथ बनसोडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरात आणि कलर बेल्ट परीक्षेला बसणाऱ्या विविध गटातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
बेल्ट परीक्षेमध्ये तसेच मागील वर्षी शालेय व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा नगरसेवक समाधान आवळे आणि मुख्य प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
——-
कलर बेल्ट परीक्षेतील यशस्वी
युविका होटकर, कृतिका केकडे, मौर्य केकडे, आदिनाथ तीर्थ, नित्या तीर्थ, कृष्णा वाघमारे, अथर्व बरडे, शुभम माने, वैष्णवी शिंदे, सृष्टी शिंदे, कार्तिक पवार, विनीत शिवशरण, कृष्णाली होटकर, देवराज रणशुगारे, त्रिशा होटकर, आराध्या ओहाळ, प्रबुद्ध नागटिळक, श्लोक चारे आणि तेजस्विनी शिंदे यांनी यश मिळवले.
—–























