सांगोला – तालुक्यातील आपुलकी मिञ मंडळ, कडलास या संस्थेच्या फलकाचे अनावरण बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल पाटील, समाधान पवार, तानाजी पाटील, विजयसिंह पाटील, निशा देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगतात संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.बबन गायकवाड यांनी संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय सांगत सामाजिक, शैक्षणिक कार्यातून विद्यार्थ्यांना मदत व प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितलेे.
बाबुराव गायकवाड यांनी संस्थेस मदत करू असे सांगितले. संस्थेचे सचिव शहाजी पाटील यांनी आभार मानले.
























