सोलापूर : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कोंडी, बीबी दारफळ परिसरात अवैध गौण खनिज उत्खननावर मोठी कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
या कारवाईत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त करण्यात आले आहे. संबंधितांवर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार अवैध खनिज उत्खननाविरोधात कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर उपक्रमांना आळा घालण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
























