सोलापूर – श्रीक्षेत्र तीर्थ (ता. द. सोलापूर ) येथील श्री रामलिंगेश्वर यात्रा भक्तिमय वातावरणात व प्रबोधनात्मक डफावरील गाण्यानी, महाप्रसाद भोजनानी वैभवात संपन्न झाली.
रात्री आठ वाजता मिरवणूकीला प्रारंभ होऊन अकरा वाजेपर्यंत शोभेच्या दारूकामाच्या आतश बाजीने, मलकारसिद्ध झाँज पथकाच्या शैलीदार अदाकारीने पालखी मिरवणुकीत रंगत आणली.
नंदिध्वज मिरवणूक शिस्तबद्ध झाली.
या वर्षी गावाकऱ्यांच्या सहयोगाने पंचकमिटीने मंदिरासमोर फुलझाडे लावून आकर्षक पद्धतीने सजावट केली होती.वळसंग येथील सदभक्त चनशेट्टी काकांनी कट्टा बांधण्यासाठी मोफत सिमेंट गट्टू मंदिर समितीला दिले.
पालखी मिरवणूकीला भाविक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मिरवणूकीने यात्रेची सांगता झाली.



























