सोलापूर – ऑलिम्पियाड परीक्षा (Olympiad Exams) या इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक चाचण्या आहेत.
या परीक्षा गणित, विज्ञान, इंग्रजी आणि संगणक यांसारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचे तर्कशास्त्र, विश्लेषणात्मक क्षमता आणि विषयाचे सखोल ज्ञान वाढवण्यास मदत करतात. त्यामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल धाराशिवचे गणित विषयांमध्ये लेवल वन मध्ये एकूण 53 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत चमकदार कामगिरी केली.
या यशाबद्दल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर वाल्मिक सोमासे सर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्कूलचे व प्राचार्य श्री निलेश जाधव सर, वरिष्ठ समन्वयक श्री प्रभाकर चौधरीसर, दिपक अंकुश सर तसेच पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



























