जेऊर – करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाऱी चिखलठाण येथील कोटलिंग देवाच्या यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी छबिना मिरवणूक होणार आहे
राज्यातील सोलापूर सातारा पुणे नगर धाराशिव जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या करमाळा तालुक्यातील कोटलिंग देवाची यात्रा चैत्री पौर्णिमेस कोटलिंग जोगेश्वरी विवाह सोहळ्यापासून सुरू झाली असून चैत्र कृष्ण अष्टमी म्हणजेच १० एप्रिल रोजी छबिना मिरवणूक संपन्न होत आहे. यात्रेसाठी पाळणे, प्रसाद , नारळ , खेळणी यासह विविध वस्तूची विक्री करणारे छोटे-मोठे व्यवसायिक विक्रेते यांनी आपली दुकाने थाटली आहेत.
चिखलठाण कोटलींग मंदिर येथे तालुक्यातील यात्रेदरम्यान विविध ठिकाणाहून आलेल्या यात्रेकरूंना सुखकरपणे सर्व व्यवस्था व्हावी यासाठी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग,महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभाग, पंचायत समिती,यात्रा समिती ग्रामपंचायत व ग्रामस्थांची यात्रा कालावधीत जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीच्या सचना दिल्या आहेत.
यानुसार सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली असून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये यात्रा कालावधीत पुरेसा पोलिस बंदोबस्त, तैनात असेल तातडीच्या उपचारासाठी ॲंब्युलंस,प्रथमोपचार व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतील तसेच यात्रेकरूंच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली करण्यात आली आहे.
महावितरणच्या वतीने परिसरात पुरेशा प्रकाशनासाठी दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ग्रामस्थ, यात्रासमीती व ग्रामपंचायतींच्या वतीने परिसरात स्वच्छता करण्यात आली असून स्वच्छ पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे१० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून या देवाच्या मानाच्या कावडी धार घालण्यास सुरुवात करतील,दिवसभर दंडवट,नवस फेडणे, देवदर्शन होऊन सायंकाळी साडेअकरा वाजता आरती होऊन छबिना मिरवणूक होणार यात्रेपुर्वी वीस दिवसांपासून या देवाला तेल लावले जाते तेंव्हापासून ससा- मासा,देव पारध,देव शिकारीला जाणे, कोटलींग जोगेश्वरी विवाह सोहळा आंबील पौर्णिमा उत्सव असे कार्यक्रम होतात या कालावधीमध्ये मांसाहार करणे, शेती मशागतीची कामे, दाढी करणे, केस कापणे गादीवर झोपणे या गोष्टी या गावात पूर्णपणे बंद असतात चैत्र अष्टमीला मुख्य छबिना मिरवणूक होते या दिवशी देवाच्या मानाच्या कावडी धार घालतात यानंतर दुसऱ्या दिवशी शेळी जत्रा नंतर बाजार व तेल उतरवणे असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे .



























