बार्शी – येथील सुयश विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इयत्ता पहिलीचे गुणवंत विद्यार्थी- वेदिका दशरथ मोरे – 148 गुण (राज्यात दुसरी), राजवीर विवेक गोरे – 146/150 (राज्यात तिसरा), सानवी सतीश गाढवे – 146/150 (राज्यात तिसरी), कार्तिकी बालाजी नागरगोजे – 144/150 (राज्यात चौथी), संस्कृती धनंजय अमराळे – 142/150 (राज्यात पाचवी).
इयत्ता दुसरीचे गुणवंत विद्यार्थी- विराज सुनील ठोंगे – 150/150 (राज्यात पहिला), राजवीर अमोल नलवडे – 148/150 (राज्यात दुसरा), परिणीती हिरामण महाले – 148/150 (राज्यात दुसरी), नक्षत्रा धनेश जगदाळे – 146/150 (राज्यात तिसरी), अमित मनोजकुमार मुंडे – 146/150 (राज्यात तिसरा), श्रेयश प्रितम सुरवसे – 144/150 (राज्यात चौथा), शांभवी संजयकुमार मंडगे – 142/150 (राज्यात पाचवी).
इयत्ता तिसरी- शेळवणे सुबोध महेश- 284/300. जिल्ह्यात तिसरा, जाधव ज्ञानेश गोरख.282/300 जिल्ह्यात चौथा
इयत्ता चौथी- आर्या रोहित बाशिंगे.290/300 राज्यात सहावी जिल्ह्यात प्रथम क्रमांक. विराज सचिन आवटे .282/300 राज्यात दहावा जिल्ह्यात पाचवा क्रमांक.
इयत्ता – पाचवी- ठोंगे वेदिका सुनील – 296/300, राज्यात दुसरी, घोळवे ऋतुराज अंकुशराव – 292/300, राज्यात चौथा, जाधव आरुषी राहुल – 292/300, राज्यात चौथी,
घोळवे शौर्य अंकुश.288/300 राज्यात-सहावा, जिल्ह्यात-प्रथम, राक्षे प्राजक्ता कांचन – 284/300 राज्यात-आठवी, जिल्ह्यात – तिसरी.
इयत्ता-सहावी- निकम कृष्णमेघ अजित-280/300 जिल्ह्यात 1 ला राज्यात 7 वा, इतापे स्वरा शरद 274/300 जिल्ह्यात 3 री राज्यात 10वी.
इयत्ता सातवी- गिरीश दिगंबर देवकर -264/300 जिल्ह्यात 4 था राज्यात 14 वा.
इयत्ता आठवी- ऊर्विच सचिन दराडे-278/300 जिल्ह्यात 1 ला राज्यात 8 वा, सर्वज्ञ प्रदीप खराडे -276/300 जिल्ह्यात 2रा राज्यात 9 वा, पृथ्वीराज परमेश्वर मुके- 268/300 जिल्ह्यात 4था राज्यात 12 वा, तेजस बाळू जाधवर- 266/300 जिल्ह्यात 5 वा राज्यात 14 वा.
या सर्व विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या शिक्षकांचे परिश्रम, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली जिज्ञासा व स्पर्धात्मक वृत्ती हे प्रमुख घटक ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षक वर्गाने सातत्याने घेतलेली मेहनत आणि दिलेले सक्षम मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे, संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक येवले सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करुन अभिनंदन केले.
























