करकंब – येथील सायली किशोर दुधाणे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक कर अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल समस्त कोष्टी समाज बांधव, भगिनींच्या वतीने मंगल टकले यांच्या शुभहस्ते सह्रदय सत्कार करण्यात आला.
प्रथमतः श्री.चौंडेश्वरी मातेची पूजा सायली दुधाणे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली.याप्रसंगी कोष्टी समाजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी गितांजली टकले यांनी स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना संबंधित कुटुंबीयांनी जरी साथ दिली तरी यशस्वी झालेल्या व्यक्तीचे स्वतःचे ९५टक्के कष्ट असतात.स्वत: कष्ट घेतले तरच यश प्राप्त होते.
सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षेत वाढती स्पर्धा लक्षात घेता हे मिळवलेल यश हे टकले,दुधाणे परिवारासाठी खुप आनंददायी असल्याचे मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी ज्ञानेश्वर दुधाणे, प्रभाकर टेके,चंद्रकांत रसाळ,संजीवकुमार म्हेत्रे,स्नेहा दुधाणे,सुनील दुधाणे,यांनी मनोगते व्यक्त करत सायली दुधाणे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करत अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कोष्टी समाज बंधू,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सहाय्यक कर अधिकारी हे पद प्राप्त झाले असले तरी यापुढेही वरिष्ठ पद मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असेल. कुटुंबीयातूनच दत्तप्रसाद नडे वर्धा जिल्हा जात पडताळणी कमिटी अध्यक्ष,गितांजली टकले उपविभागीय पोलीस अधिकारी,सागर टकले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत आहे.त्या मार्गदर्शनाचा भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
सायली किशोर दुधाणे, नूतन सहाय्यक कर अधिकारी.






















