सोलापूर – बार असोसिएशन हॉल येथे महान समाजसुधारक, शिक्षणाचे पुरस्कर्ते व समतेचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन भावपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या समाजपरिवर्तनातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातही असलेली प्रासंगिकता अधोरेखित केली.
सोलापूर बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील ॲड. अजय रणशुगारे, माजी सचिव ॲड. श्रीनिवास क्यातम तसेच बारचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी आपल्या मनोगतातून फुले यांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी शिक्षण, समता, व सामाजिक न्याय या मूल्यांसाठी दिलेल्या लढ्याची आठवण करून देत सर्वांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. मळसिद्ध देशमुख यांनी मानले.
या कार्यक्रमास बारचे माजी अध्यक्ष ॲड. धानय्या चिवरी, ज्येष्ठ वकील ॲड. बसवराज सावळगी, ॲड. असीम बांगी, ॲड. विवेक शाक्य, ॲड. अविनाश बिराजदार तसेच इतर अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















