मोहोळ – येथील पंचशील मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी दिला जाणारा पंचशील रत्न पुरस्कार यावर्षी सोलापूरच्या धम्म प्रचारक शारदाताई गजभिये यांना देण्यात येणारअसून१६ एप्रील रोजी त्यांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती पंचशील मंडळाचे अध्यक्ष शशीकांत ठोकळे, जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष विशाल रोडे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचशील क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने बौद्ध धम्म प्रचाराचे प्रचाराचे काम करणाऱ्या एका व्यक्तीची निवड करून त्यांना या मंडळाच्या वतीने “पंचशील रत्न पुरस्कार”, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान केला जातो. आतापर्यंत मंडळाने भारतीय बौद्ध महासभेचे धम्म प्रसारक अण्णासाहेब वाघमारे, धम्म रक्षिता कांबळे , संगमेश्वर कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख संघप्रकाश दुडे, साहित्यिक योगीराज वाघमारे, पंढरपूरचे बाणा धांडोरे, दिवंगत प्रभाकर सुतकर, आदींना धम्म रत्न प्राचार्य कमलाकर कांबळे डॉ एम डी शिंदे आदींना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे
यावर्षी सोलापूरच्या धम्म प्रसारक शारदा ताई गजभिये यांना १६ एप्रिल रोजी सायं मोहोळ विधान सभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे वतीने शशीकांत ठोकळे विशाल रोडे यांनी जाहीर केले यावेळी संस्थापक अशोक पाचकुडवे, धनंजय जगताप, हनुमंत भडकवाड, सुनील गायकवाड,संजय आठवले,आदर्श ढवळे अक्षय आठवले दीपक मडीखांबे,सुरज पाचकुडवे आदी उपस्थित होते .
























