पंढरपूर – विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमी निर्माण कृती समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.१५ ) विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे बुद्धभूमी निर्माण कृती समितीचे कार्याध्यक्ष दीपक चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कसबे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी भर उन्हाची तीव्रता असतानाही रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले.
या रक्तदान शिबिराला सामाजिक कार्यकर्ते आणि भीमसैनिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या भीमसैनिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चांदीची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बुद्धभूमी निर्माण कृती समितीचे रवींद्र शेवडे, अमित कसबे, स्वप्निल गायकवाड, महेश मोटे, विशाल मांदळे, योगेश जाधव, लियाकत मुलानी, अजिंक्य ओव्हाळ, राहुल जाधव, दिगंबर करपे, बुद्धभूषण चंदनशिवे, धनराज शेवाळे, समाधान लोखंडे आदी उपस्थित होते.
————
पंढरपूर – रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या भीमसैनिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चांदीची प्रतिमा भेट देताना आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कसबे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रा. सुभाष मस्के, बुद्धभूमी निर्माण कृती समितीचे कार्याध्यक्ष दीपक चंदनशिवे.





















