सोलापूर – हृदयविकार उपचारांमधील जागतिक दर्जाचा अनुभव आता सोलापूरकरांना स्थानिक स्तरावर मिळणार आहे. डेन्मार्क येथील प्रख्यात आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधून विशेष प्रशिक्षण घेतलेले आणि देशातील अग्रगण्य एम्स, नवी दिल्ली येथे ‘कन्सलटंट कार्डिओलॉजिस्ट’ म्हणून सेवा दिलेले डॉ. चिन्मय परळे आता सोलापूरमध्ये प्रॅक्टिस सुरू करत आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे शहरातील वैद्यकीय सुविधेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. चिन्मय परळे यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा संस्थांमधून शिक्षण घेतले आहे. cet परीक्षेत पूर्ण महाराष्ट्रात पाचवा नंबर मिळवून त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस आणि एमडी पूर्ण केले. त्यानंतर, पुडुचेरी येथील राष्ट्रीय महत्त्वाच्या जिपमर संस्थेतून त्यांनी हृदयविकार शास्त्रातील सर्वोच्च पदवी ‘डी.एम. कार्डिओलॉजी’ संपादन केली. त्यानंतर इलेक्ट्रोफिजियोलॉजी मध्ये विशेष प्रशिक्षण घेतले.
डेन्मार्क येथे त्यांनी हृदयाच्या झडपांच्या गुंतागुंतीच्या आजारांवर विना-शस्त्रक्रिया उपचार करण्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. अशा प्रकारचे औपचारिक प्रशिक्षण घेणारे ते देशातील मोजक्या तज्ज्ञांपैकी एक आहेत.
अशा या उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे भारतातील सर्वोच्च संस्था AIIMS Delhi येथे त्यांची हृदयविकार तज्ञ म्हणून निवड झाली. अशी उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी घेऊन, पुणे मुंबईच्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल मधील संधी नाकारून, सोलापूर मधील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ चिन्मय परळे येथे कार्यरत होत आहेत.


















