सोलापूर – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये आठवा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत सर्व ग्रामीण प्रकल्पमध्ये 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जात असून त्याचा समारोप प्रतिष्ठा मंगल कार्यालय, टेंभूर्णी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. दीपक वैद्य यांच्या अधक्षतेखाली करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री दीपक वैद्य, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती कु अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्या श्रीम सविता कोकाटे , अश्विनी दळवी , वंदनाताई कांबळे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, पंचायत समिती कुर्डुवाडी उपसभापती श्रीम स्वाती गिडडे , पंचायत समिती सदस्या श्रीम प्रतिभा खरात , श्रीम प्राजक्ता पाटील , श्रीम छाया करंडे , श्रीम अमृता पाटील , पंचायत समिती सदस्य श्री. तात्या अनपट , श्री सचिन पाटील , श्री दिगंबर माळी , ग्रा प सदस्य नागनाथ वाघे , सरपंच श्री हनुमंत गिडडे , श्री संदीप पाटील , श्री करंडे व जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकारी श्री किरण सूर्यवंशी , श्री विशाल भोसले , श्री समाधान नागणे , श्री अभिजीत मोलाणे , श्री राहूल चव्हाण , श्रीम सुवर्णा जाधव , श्रीम योगिता वैराट आणि श्री बालाजी आल्लडवाड उपस्थित होते.
कार्यक्रमांची सुरुवात दिपप्रज्वलनाने केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महिला बालकल्याण सभापती कु अमृता वाघे तसेच इतर सर्व मान्यवरांनी अंगणवाडी सेविकांनी भरविलेल्या पौष्टिक पाककृती प्रदर्शनास भेट देऊन पाककृतींचा आस्वाद घेतला. यावेळी शेवग्याच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पाककृती तसेच नाचणी,बीट, सोयाबीन, शासनाचा THR पासून जवळपास 100 प्रकारच्या पाककृतीचे प्रदर्शन पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष मा. दीपक वैद्य व महिला बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविकाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा कार्यकम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिनांक 09 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत पोषण पंधरवडा मध्ये साजरे केलेले कार्यक्रमाबाबत उपस्थिताना अवगत केले. आठवा राष्ट्रीय पोषण पंधरवडा हा , बालकाच्या जीवनातील पहिल्या सहा वर्षातील मेंदूचा विकास या संकल्पनेवर आधारित असून त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व अंगणवाडी केद्रांमध्ये सुरु असणाऱ्या कार्यक्रमांबाबत सर्व मान्यवरांना अवगत केले. सध्याच्या काळात बालकांना मोबाईल चे व्यसन लागले असून स्क्रीन च्या अतिवापराचे दुष्परिणाम बाबत व त्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत देखील अंगणवाडी सेविकांनी पालकांना अवगत करणेबाबत श्री. प्रसाद मिरकले यांनी मार्गदर्शन केले.
बालकाच्या वयाच्या 5 वर्षा पर्यंत मेंदूचा विकास 60% होत असलेने या काळात जर बालकांना मोबाईल चे व्यसन लागू नये यासाठी आरंभ – विकास बालकांचा व आकार अभ्यासक्रमाचा वापर करून बालकांचा स्क्रीन टाइम कमी करणेबाबत पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी श्री प्रसाद मिरकले यांनी केले.
याप्रसंगी महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी अंगणवाडी सेविका या कोणत्याही योजनेच्या गावात दूत म्हणून काम करीत असून त्यांचे काम खरोखरच चांगले असलेचे व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागामध्ये पोषणबाबत जागरूकता वाढविणे व कुपोषण कमी करणेबाबत वरचेवर असे जास्तीत जास्त उपक्रमांचे आयोजन करणेबाबत सूचना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष श्री दिपक वैदय यांनी यावेळेस बाळांचे पहिले 1000 दिवसांचे महत्व विषद केले तसेच मिशन वात्सल्य अंतर्गत एकल महिलांचा सर्वे सुरु असून अशा एकल महिलांना शासनाच्या आवश्यक असणाऱ्या योजनेचा लाभ देण्याबाबत सेविकांना आवाहन केले.
कार्यक्रमावेळी अंगणवाडी बालकांना विदयारंभ प्रमाणपत्रे, मातांना बेबी केयर किट, पूर्व शालेय किट, आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी योजनाचे साहित्य तसेच प्रमाण पत्रांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये किशोरी व महिलांची HB तपासणीबाबत कँप आयोजित करुन आरोग्य विभागाकडील आशा वर्कर व आरोग्य सेविकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषद सदस्या श्रीम सविता संजय कोकाटे यांनी मुलांनी रिल्स पाहू नये याबाबत मार्गदर्शन केले तसेच पंचायत समिती माढा उपसभापती श्रीम स्वाती गिडडे , पंचायत समिती सदस्या श्रीम करंडे , श्रीम पाटील , जि प सदस्या श्रीम दळवी , श्रीम कांबळे व श्री संदीप पाटील कुर्डु यांनी देखील 1000 दिवस बाळाचे , मातांनी घ्यावयाची काळजी तसेच अंगणवाडी सेविकांचे समाजातील योगदान या विषयांवर उपस्थित अंगणवाडी कर्मचारी व महिलांना मार्गदर्शन केले व सर्व अंगणवाडी सेविकांच्या कामकाजाचे कौतुक केले.
बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांनी उपस्थित अधिकारी पदाधिकारी व महिलांकडून पोषण शपथ घेऊन आभार व्यक्त केले व कार्यक्रमांची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी श्री किरण सूर्यवंशी यांनी केले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेसाठी विस्तार अधिकारी श्री आकाश कोकाटे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीम अनुराधा मिस्कीन , श्रीम लता पाटील , श्रीम खटके , श्रीम मगर , श्रीम बारबाले, श्रीम पवार, श्रीम शिंदे, श्रीम लोखंडे व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेवून नियोजन केले.


























