जेऊर – करमाळा तालुक्यातील कंदर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कंदर येथील अण्णासाहेब कदम या शेतकऱ्याची सात एकर केळी या वादळी वाऱ्यामध्ये भुईसपाट झाली असून 45 ते 50 लाख रुपयांचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे तातडीने या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी चांगलाच बसला असून केम, कंदर,वडशिवणे ,सातोली भागातील अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या पिकाचे नुकसान झाले आहेत लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनीउभी केलेली पिके या वादळी वाऱ्याने व भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून आखाती युद्धामुळे दर पडल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील केली जात आहे.
प्रतिक्रिया:-अण्णासाहेब कदम (केळी उत्पादक शेतकरी कंदर) माझ्या सात एकर शेतामध्ये ऑगस्ट महिन्यात साडेआठ हजार केळीची रोपे लागवड केली होती सध्या केळीची विन पूर्ण होऊन एक ते दीड महिन्यात केळी काढणीला येणार होती अशा परिस्थितीमध्ये वादळी वाऱ्याने संपूर्ण केळीचे पीक भुईसपाट झाले असून फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे
.
२) प्रतिक्रिया:-किरण डोके ( केळी निर्यातदार कंदर )वादळी वाऱ्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मे महिन्यात जिल्ह्यातील केळी पिकाचे मोठे नुकसान होते. नुकसान झाल्याबरोबर शासनाकडून या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने दिली गेली पाहिजे नुकसान भरपाई सध्याच्या प्रचलित निकषानुसार फारच अल्प असून किमान उत्पादन खर्चाच्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळावी
फोटो ओळी:-वादळी वाऱ्यामुळे भुईसपार झालेली कंदर येथील अण्णासाहेब कदम या शेतकऱ्याची केळीची बाग


























