सोलापूर: दयानंद कॉलेजच्या मैदानावर १ मे रोजी ‘अभिसिद्ध पेरेंट्स लीग’ क्रिकेट स्पर्धेचे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पार पडलेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन श्री. चिराग वेलांनी, चिराग शाह, सोहेल शेख आणि नवीन माने या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.
सामन्यांचा संक्षिप्त वृत्तांत:
- पहिला सामना: अभिसिद्ध विरुद्ध संजीवनी स्ट्रायकर्स प्रथम फलंदाजी करताना अभिसिद्ध संघाने १३.२ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात संजीवनी स्ट्रायकर्सने १३ षटकांत ३ बाद १०९ धावा करत विजय मिळवला. करण चाकोते याला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
- दुसरा सामना: माऊली मास्टर्स विरुद्ध टाईम्स सीसी माऊली मास्टर्सने १५ षटकांत ६ बाद १३५ धावांचे आव्हान ठेवले होते. टाईम्स संघाने धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या १२.४ षटकांत ४ बाद १३९ धावा करून सामना खिशात घातला. प्रविण यादव सामन्याचा मानकरी ठरला.
- तिसरा सामना: फ्रेंड्स स्ट्रायकर्स विरुद्ध सलगर वॉरियर्स फ्रेंड्स संघाने १५ षटकांत ६ बाद १०९ धावा केल्या. हे लक्ष्य सलगर वॉरियर्सने १२.५ षटकांत ३ बाद ११० धावा करत पार केले. बिरू याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
- चौथा सामना: रायझिंग स्टार विरुद्ध बी.जी. रॉयल्स प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टारने १५ षटकांत ३ बाद १६५ धावांचा डोंगर उभा केला. बी.जी. रॉयल्सचा संघ १४.४ षटकांत १२९ धावांवर गारद झाला. रोहन ढेपे याला उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर निवडण्यात आले.
पंच व गुणलेखक: या सामन्यांसाठी पंच म्हणून चंदू मंजेली, अशोक डोंबाळे, इर्शाद बिराजदार आणि प्रवीण कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर गुणलेखक (Scorers) म्हणून सचिन गायकवाड, मिलिंद गोरे आणि साई पवार यांनी चोख जबाबदारी पार पाडली.























