बार्शी – येथील नाळे प्लॉटमधील रहिवासी धीरज अमर पोळ (वय १७ वर्षे ७ महिने) हा तरुण २९ एप्रिल रोजी सकाळी ९-३० वाजता भगवंत मंदिरासमोरुन बेपत्ता झाला असून, अज्ञात इसमाने त्याला फूस लावून पळवून नेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ३३४/२०२६ बीएनएस कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवसापासून धीरजचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. तरी या मुलाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या ०२१८४-२२३३३३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा तपास अंमलदार मुंडे यांच्या ९५५२५१२९४८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



























