सोलापूर – मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय,श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा,श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर या शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे,मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,विनायक हत्तुरे,ज्येष्ठ शिक्षक अण्णाराया तुप्पद,बसवराज कोरे व प्रमुख अतिथी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन जाधव,बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका संगिता हुमनाबादकर उपस्थित होते.मान्यवरांच्या व अतिथींच्या शुभहस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजावतरण करण्यात आले. प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे यांनी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाविषयी माहिती सांगितली व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भारत राऊत,गंगाराम घोडके,विद्याधर हुलगेरी,अनिलकुमार गावडे,अनिता हौदे,परमेश्वर चांदोडे,संतोष हिरेमठ,गणेश कोरे,संतोष स्वामी,अमरनाथ कदारे, लक्ष्मीकांत पनशेट्टी, प्रतीक्षा बिडवे,प्रिया पसारे,सुनीता गंगोडा व शिक्षण संकुलातील सर्व विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आगवणे यांनी केले,सुकेशनी गंगोडा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

























