सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इ.12 वी बोर्ड परीक्षेत रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 93.57% लागला असून विज्ञान शाखेचा निकाल- 100% तर कला शाखेचा निकाल-77.41% लागला.
विज्ञान शाखेत प्रथम- सिद्धेश्वर बसवराज वाकडे 79.17%, द्वितीय-अथर्व सुभाष माने 78.33%,तृतीय-कु. वैभवी चिदानंद हिरेमठ 77.17% क्रमांक मिळविले.
कला शाखेत प्रथम-सुशांत सिद्धाराम वग्गे 74.00%,द्वितीय-अंजली राजू पवार 71.83%,तृतीय-विजयालक्ष्मी बबन लाड 70.17% क्रमांक मिळविले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक सर्व प्राध्यापकांचे,संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री अप्पासाहेब हत्तुरे सर व संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सिध्दप्पा वरनाळ सर,मा.संस्थेचे सचिव नागप्पा सिंदगी साहेब,माजी प्राचार्य श्री वैजिनाथ हत्तुरे सर,मार्गदर्शक श्री धरेप्पा हत्तुरे सर,प्र. मुख्याध्यापक रमेश दिंडोरे सर यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

























