सोलापूर – डॉ.आंबेडकर मेमोरियल फंड समिती जिल्हा सोलापूर संचलित डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूल व डॉ. आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरे करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष. भागवत सरवदे ,संस्थेचे सचिव प्रवीण निकाळजे, विश्वस्त शशिकांत बापू कांबळे,डे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संतोषी साबळे मॅडम, नाईट प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सतीश शिंदे सर हे व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भगवद्जी सरवदे यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आहे. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका.श्रीमती संतोषी साबळे मॅडम यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री भागवत सरवदे, संस्थेचे सचिव श्री प्रवीण निकाळजे साहेब संस्थेचे विश्वस्त श्री शशिकांत बापू कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाईट प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सतीश शिंदे सर यांनी होते. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ. चित्रा धाराशिवकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भगवत सरवदे साहेब यांनी अध्यक्षीय भाषण होते. या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक माने सर आणि श्री विश्वनाथ कुलकर्णी सर यांनी होते. तर आभार श्री सुशील जानराव सर यांनी केले.


























