सोलापूर – निलम नगर येथील नेताजी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ६७ वा महाराष्ट्र दिन व १३५ वा जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या श्राव्या नडगेरी या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पालक-शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पुजारी, नागेश कोल्हापुरे, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार , रुपाली नडगेरी, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक शाळेतील आदित्य बिराजदार, श्रावणी नागठाण, श्राव्या नडगेरी माध्यमिक प्रशालेतील जान्हवी कांबळे, पृथ्वीराज जमादार, व्यंकटेश मिस्कीन, इरेश अक्का,ओंकार एडके व महाविद्यालयातील पल्लवी भोरगुंडे, रेवती कुलकर्णी, जयश्री भोरगुंडे, सुधाश्री चिटकुल, लक्ष्मी निंबर्गी, भार्गवी शिरपूर, स्वाती ठोंबरे, योगिता पगड्याल ,श्रावणी पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कामगार दिनानिमित्त नागेश कोल्हापुरे यांना आदर्श कामगार पालक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रमुख अतिथी विजयकुमार हुल्ले म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कष्टाची जोड देऊन जीवनात यश संपादन करावे.प्राचार्य रविशंकर कुंभार म्हणाले, प्रत्येक यशामागे कष्ट आणि शिस्त महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी या मूल्यांचा अंगीकार करून आपले भविष्य घडवावे.
यावेळी इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


























