सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक, थोरला राजवाडा, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शिंदे व कर्जाळ गावचे युवा नेते संदेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन प्रबुद्ध भारत विहारामध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी लहान मुलांना पापा दायमा यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले. तसेच कामगार दिनानिमित्त सर्व कामगार वर्गास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी शुभेच्छा दिल्या. कोणत्याही मोह मायेमध्ये न अडकता आपल्या जीवनाचे आपले जीवन चांगले जगावे. तथागत गौतम बुद्धांनी दिलेले प्रज्ञा शील व करुणा हे तत्व आत्मसात करून आपल्या जीवनाचे सार्थ करावे, असे आवाहन चांदणशि केले.
श्रीमंत जाधव , प्रा. अविनाश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी भारत बाबरे, गौतम इंगळे, पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, कार्याध्यक्ष विकी कांबळे, गौतम नागटिळक, ॲड. विशाल मस्के, सिद्धार्थ सुर्वे, मनोज थोरात, भैय्या कापुरे, गौरीशंकर शिंदे, अमित माने, प्रदीप शिंदे, संजय इंगळे, बाबा गायकवाड, संतोष चंदनशिवे, गौतम शिंदे, रवी सकट, प्रदीप गवळी, योगेश सरवदे, अरविंद गायकवाड, बाळासाहेब शिंदे, राजाराम लोखंडे, विकी माळाळे,प्रतिक चंदनशिवे,रवींद्र गवळी, भीमा मस्के, रोहन तळभंडारे, लखन चंदनशिवे, मनीष साळवे, सिद्धार्थ तळभंडारे, विशाल वडवेराव, सुनील गायकवाड, सुनील कांबळे, सुजल शिंदे, रत्नशील इंगळे तसेच पी.बी. ग्रुप चे कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.

























