सोलापूर – चव्हाण शोरूम च्या बाहेर पडलेल्या एका नवीन मोटार कारने दुचाकीला धडक दिली .यात दुचाकी वरील दोघे पती-पत्नी मार लागून जखमी झाले असून याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात पळून गेलेल्या संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत म.रफिक म. मजीद जमखंडी (रा. २०५ पर्ल अपार्टमेंट , होटगी रोड, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी हे २७ एप्रिल रोजी संध्याकाळी दुचाकी (क्रं. एम एच १३ – ई एन २८४२ ) वरुन पत्नीसह जात असताना होटगी रोडवरील चव्हाण शोरुम मधुन निघालेली एक नवीन पांढरे रंगाची कार ही भरधाव वेगाने, निष्काळजीपणने चुकीचे दिशेने येवून फिर्यादीच्या दुचाकीस डावे बाजुस धडक दिल्याने फिर्यादी व त्यांची पत्नी रस्त्यावर पडुन जखमी झाले . मात्र कार चालकाने फिर्यादीस उपचारास दाखल न करता अपघात स्थळावरून तसाच निघुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पोलीस हवलदार मणुरे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.


























