Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला आग

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in editor
0
तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला आग
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : तुळजापूर रोडवरील कचरा डेपोतील दोन मोठ्या ढिगार्‍यांना सोमवारी दुपारी भीषण आग लागली. य वाढत्या तापमानामुळे आणि अतिउष्णतेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

​            दुपारी ४.२२ वाजता कचरा डेपोला आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला प्राप्त होताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ८ एकरच्या या विस्तीर्ण परिसरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपैकी दोन मोठ्या ढिगाऱ्यांनी पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळावर आग विझवण्यासाठी सक्रिय कार्यरत आहेत.सायंकाळी ६.४५ पर्यंत एकूण १५ गाड्या पाण्याचा फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, लवकरच ही आग आटोक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी दिली. अधीक्षक राकेश साळुंखे हे घटनास्थळी तळ ठोकून होते.

       कचऱ्याच्या ढिगार्‍यांमध्ये  मिथेन हा वायू असतो. हा मिथेन वायू साधारण ४० ते ४३ अंश सेल्सिअस  तापमानामध्ये पेट घेतो. सोलापूर शहरातील तापमान आज ४०.८ अंश सेल्सिअस वर असल्याने आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४ वर्षांपूर्वी लागली याच दिवशी आग 

तुळजापूर रोडवरील कचरा डेपो मध्ये ४ मे २०२२ रोजीच उष्णतेमुळे आग लागल्याची घटना घडली होती.  २५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ७० टक्के आग विझवण्यात प्रशासनाला त्यावेळी यश आले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी म्हणजे सन २०२४ च्या मे महिन्यात देखील आगीची घटना घडली होती. आतापर्यंत डेपोला ३१ वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. 

अतिउष्णतेमुळे ही आग लागली असावी : अधीक्षक राकेश साळुंखे 

​अतिउष्णतेमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सध्या ५ गाड्यांच्या माध्यमातून काम सुरू असून आग लवकरच आटोक्यात येईल. आग पूर्णपणे शांत झाल्यानंतर परिसरात तातडीने ‘कुलिंग ऑपरेशन’ हाती घेण्यात येणार आहे, जेणेकरून आग पुन्हा उद्भवणार नाही, असे महापालिका अग्निशमन दल अधीक्षक राकेश साळुंखे यांनी स्पष्ट केले.

Post Views: 46
Previous Post

सेवासदन प्रशालेची विविध वयोगटांमध्ये सुवर्ण कामगिरी 

Next Post

तरुणाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
तरुणाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी 

तरुणाच्या खून प्रकरणी सहा आरोपींना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी 

ताज्या बातम्या

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

जि. प. प्राथमिक केंद्र शाळा परिते येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 20, 2026

जिल्हा प्रशासनाकडून आता येथील सर्वसामान्य नागरिकांना काँरिडोरबाबत माहिती देण्याची गरज

June 20, 2026
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला

June 20, 2026

भूम येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी

June 20, 2026

१९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघ निवड चाचणी २७ व २८ जून रोजी

June 20, 2026
पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

पाणीपुरवठा योजनेत शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये : महापौर कोंडयाल

June 19, 2026
इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

इंग्लिश स्कूल प्रशालेची स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम.

June 19, 2026

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0922875

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697