सोलापूर – येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे एकनाथ स्वाभिमान शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने साप्ताहिक मित्रप्रेमचे कार्यकारी संपादक रिजवान शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी तसेच उत्कृष्ट पत्रकार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना प्रवक्ते व नवी मुंबईचे नगरसेवक अंकुश बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे, जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर मनीष अण्णा काळजे, उपशिक्षणाधिकारी (जि.प. सोलापूर) प्रकाशजी नांगरे, वेतन अधीक्षक लक्ष्मणजी बालवाड, तसेच जिल्हाप्रमुख शिवसेना महेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश दादा चिवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.


























