पंंढरपूर – पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात उडी मारून आज आत्महत्या करू पाहणा-या एका वयोवृद्धाचा जीव नदी पात्रात असलेल्या कोळी समाजातील तरुणांनी प्रसंगावधान राखून वाचवला आहे.
समजलेल्या या माहिती नुसार नाव रघुनाथ कोरडे (वय ७६) रा. हिंगणी,ता.तेलारा, जि.
अकोला असं या वृध्दाचं नाव असुन आयुष्याचा कंटाळा आल्याने आता आपला जीव विठ्ठलास समर्पित करायचं या भावनेनं आपण चंद्रभागेच्या पात्रात उडी घेऊन जीव देत होतो, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले की, जर वेळीच आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीचे
विठ्ठल नितीन आधटराव,
महेश जितेंद्र परचंडे,
सुहास कुमार साळुंखे,
साहिल सत्यवान माने ,
संकेत सोमनाथ कोरे, गणेश बाळू कोळी या
तरूण बांधवांनी प्रयत्न केले नसते तर सदर जेष्ठ नागरिक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले असते.
आम्ही वारंवार मागणी करत आहोत की, चंद्रभागेच्या पात्रात आपत्कालीन व्यवस्थापन साठी रेस्क्यू टीम नेमा, यामध्ये आमचे कोळी समाजातील पट्टीच्या पोहणा-या तरुणांना समाविष्ट करा, जेणेकरून येथे अनुचित प्रकार घडणार नाहीत, परंतू श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसुन यासाठीची उदासिनता दिसून येत आहे.
जर भविष्यात चंद्रभागेत बुडून कुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर यासाठी सर्वस्वी मंदिर समिती जबाबदार राहील. तरी तातडीने रेस्क्यू टीम ची नेमणूक करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू असा इशारा ही गणेश अंकुशराव यांनी यावेळी दिला आहे.

























