सोलापूर – महाराष्ट्र शासन व क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर, सांगोला तालुका क्रीडा कार्यालय व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका शालेय तायक्वांदो स्पर्धेस सुरुवात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन सांगोला पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर यांच्या हस्ते व तालुका क्रीडा संयोजक काशिलिंग शेळके व एकतपुर केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील खांडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेत 14 ,17 वर्षे 19 वर्षे मुले व मुली अशा दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
प्रास्ताविकात श्री. शेळके यांनी केले तालुका उद्घाटक श्री कुमठेकर यांनी विद्यार्थी खेळाडूंना मैदानावरील खेळामुळे आपले व्यक्तिमत्व फुलते व आकार घेते. तेव्हा खेळात सहभाग घेऊन आपले यश संपादन करा असे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदत्त गाडेकर यांनी केले. या प्रसंगी चव्हाण , सचिन गोतसूर्य , स्वामी ,तांबोळी ,नरळे ,सुनील माळी ,राज माळी ,घुसाळे तसेच क्रीडा मार्गदर्शक आबा वाघमोडे क्रीडा संकुलचे अमोल इमडे व लखन निंबाळकर व सर्व खेळाडू उपस्थित होते.
Post Views: 6