वेळापूर – येथील लोकविकास शिक्षण प्रसारक संस्था संचलित लोकविकास मराठी मिडीयम स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल यंदा ९३.३३ टक्के लागला असून, शाळेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेस बसलेल्या ३० विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थी यशस्वी ठरले.
या निकालात जोया सुरज तांबोळी हिने ९४.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. काजल धर्मेंद्र निषाद हिने ९३ टक्के गुणांसह द्वितीय, सायली सचिन मुंगुसकर हिने ८६.८० टक्के गुणांसह तृतीय, तर पायल चांगदेव नवले हिने ८६.६० टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर, सचिव चंद्रकांत नवले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक अमोल पांढरे व मुख्याध्यापक अजित बनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक सुनिल पताळे तसेच विजया चापले, सिनाप्पा शेंडगे, राया वाघमारे आणि ऋषिकेश राऊत या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
लोकविकास मराठी माध्यमच्या या यशामुळे वेळापूर परिसरातून विद्यार्थी, पालक आणि संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























